उत्पादन

आम्ही मुख्यत्वे साखरेचे औद्योगिक उत्पादन (घाऊक) तसंच इथेनॉलसारखी खास पद्धतीची रसायने, जैविक खते, जैवऊर्जानिर्मिती, विविध प्रकारच्या उसांची लागवड आणि औषधं तसंच जैवरसायनांचे संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत.

कर्नाटकमध्ये बागलकोट जिल्ह्यातल्या समीरवाडी आणि महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात साकरवाडी इथे आमचे कारखाने आहेत. आमच्या कार्यपद्धतीत तसंच विविध प्रक्रिया आणि संपूर्ण व्यवस्थेमध्येच आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केलेला आहे.

प्रॉडक्ट ट्रेसॅबिलिटी (एखाद्या उत्पादनाचा माग काढणं) तसंच केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्सची उत्तम पद्धतीने निर्मिती करण्यासाठी आमचे बॅच रिअॅक्टर्स कटिबद्ध आहेत.

आमचे फ्लो रिअॅक्टर्स हे किफायतशीर आहेत तसंच सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या पातळीवरही ते चोख काम बजावतात. प्रयोगशाळेतील संशोधन आणि कारखान्यांमधून तयार होणारी व्यावसायिक उत्पादने यांच्यातली दरी कमी करण्याची क्षमता आमच्यात आहे. रसायनांची घाऊक निर्मिती असो की औषधोत्पादनांची निर्मिती, कित्येक किलोग्रॅम्स ते टनांपर्यंतचं उत्पादन करण्यासाठी आमची यंत्रणा सदैव सज्ज असते.

प्रयोगशाळेतील संशोधन आणि कारखान्यातील उत्पादन यांच्यातली दरी मिटवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आलेली उत्पादनं ही त्या संशोधनांची व्यवहार्यता दाखवून देतात. सुरक्षितता आणि पर्यावरण रक्षण याकडे लक्ष देत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर आमचा भर असतो.