भूमिलाभ

भूमिलाभ, गोदावरी बायो-रिफायनरीजद्वारा उत्पादित सेंद्रिय- खत आहे. भूमिलाभच्या वापराने आपण जास्त सुपीकता, भरगोस पीक मिळवू शकतो आणि तेही कोणत्याही रासायनिक खताशिवाय. भूमिलाभ हे १००% नैसर्गिक उत्पादन आहे ज्यामुळे माती तर सुपीक होतेच आणि त्या सोबत आपणास फळ, भाज्या, फुले, पिके, झाडे, कडधान्यही उत्तम दर्जाची मिळतात.

सध्या जगभरात रासायनिक खताचा वापर जास्त झाल्यामुळे मातीची सुपीकता कमी झाली आहे, आणि त्यामुळे कमी पीक आणि पौष्टिकता कमी झाली आहे. हे शेतकऱ्यांना हि ज्ञात आहे आणि त्यामुळे च शेतकरी सुद्धा सध्या सेंद्रिय खताचा वापर करू लागले आहेत.

भूमिलाभ हे मातीच्या उत्तम दर्जा साठी एक परिणामकारक उपाय आहे. बुरशीमुळे मातीची सुपीकता वाढते. ती मातीची जैविक आणि भौतिक शक्ती वाढवते आणि त्या सोबतच सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी मदत करते. माती ची वाढलेली सुपीकता झाडांसाठी फायदेशीर ठरते. भूमिलाभ सर्व प्रकारच्या माती साठी उपयुक्त आहे. आणि ह्याच्या वापरामुळे आपल्यास रासायनिक खतावर अवलंबून राहावे लागत नाही.

 • १. भौतिक
  • सर्व प्रकारच्या मातीसाठी उत्तम
  • सर्व मोसमांमध्ये उत्तम
  • यामध्ये असणारे बुरशीसदृश घटक मातीला सुपीक बनवतात.
  • मातीचा कस वाढवतो.
  • मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करतं.
  • मातीतील पाणी धरून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पाण्याचा अभाव असतानाही पिकांना धक्का पोहोचत नाही.
  • मातीची धूप होण्यापासून रोखतं.
  • मातीचा सुगंध असतो.
  • सेंद्रिय घटक तसंच मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स असतात.
  • तण बियाणे, वनस्पती रोगजनके, नेमाटोड गाठीविरहीत.
 • २.आर्थिक
  • अत्यल्प खर्चात
  • कमी ऑपरेटिंग आणि मेंटेनन्स खर्च
  • उत्तम नफा आणि परतावा
  • उच्च उत्पादन
 • ३.३-५ वर्षांपेक्षा जास्त काळ ऑरगॅनो-केमिकल इकॉलॉजी फायदे
  • पिकांच्या उत्पादनात वाढ – २० ते ४० टक्के
  • रासायनिक खतांच्या वापरात घट – २५ ते ३० टक्के
  • जंतूनाशके आणि किटकनाशकांच्या वापरात घट – ४०-५० टक्के
  • पिकांचा दर्जा आणि आयु वाढतो. उत्पादन खर्चात घट – २५ ते ३० टक्के
  • दुर्लक्षित जमिनीचं पुनर्वसन. १०-३० टक्के जमिनीतून पूर्ण उत्पादन.
  • सर्व पिकांचा दर्जा, आयु आणि गुणांमध्ये वाढ.
 • ४. पर्यावरणीय
  • सेंद्रिय घटक तसंच मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स असतात.
  • तण बियाणे, वनस्पती रोगजनके, नेमाटोड गाठीविरहीत
  • फळे, फुले, भाज्या आणि इतर पिकांसाठी आदर्श माध्यम
  • जीवाणू, बुरशी, अँटिनोमायसिट्सचा भरणा.
  • थोडक्यात, माती, पाणी आणि कचरा व्यवस्थापनसाठी मदत होते.
  • प्रतिकूल परिणाम नाही आणि उत्तम पर्यावरण
  • पाणी, माती आणि कचरा व्यवस्थापन एकत्रित करण्यास मदत
 • ५.रासायनिक
  • मातीमध्ये पोषक घटकांचा समावेश झाल्याने रासायनिक खतांवरचा परावलंबन कमी होतं
  • बुरशीसदृश घटक मातीतील पाणी आणि इतर पोषक घटक काढून घेतात.
  • पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवत पोषक घटकांचा –हास रोखतं.
  • मायक्रोन्यूट्रियंट्सचा योग्य आणि पुरेसा पुरवठा.